Wednesday, November 30, 2022

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

अहमदनगर : भारतीय हवामान खात्याकडून नगर जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 11 ते 14 जुलै 2022 या कालावधीत जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपर्यंत जिल्हयात 166.3 मिमी पाऊस झाला असून 37.15 टक्के पाऊस झाला आहे.

11 जुलै रोजी दुपारी 12.00 वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणार्‍या गोदावरी नदीस नाशिक जिल्हयातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍्यातून 27,868 क्युसेस तसेच भिमा नदीस पुणे जिल्हयात झालेल्या पर्जन्यमानामुळे दोंड पुल येथे 23 हजार 819 क्‍्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्‍यता आहे. हवामान खात्याने इशारा दिल्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षति स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहाल. पाणापातळात बाढ हात असल्यास नदायात्रापासून तसच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्षति स्थळी स्थलांतर करावे.

नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट भर मोडकळीस 1डकळास आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्‍यता असते.

त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्यार्‍्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये.

अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षति ठिकाणी आश्रय घ्यावा.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Must read

- Advertisement -
- Advertisement -

Latest article