Friday, March 24, 2023

‘गुलामीच्या खुणा पुसण्यासाठी नामांतर ‘

‘गुलामीच्या खुणा पुसण्यासाठी नामांतर ‘

मुंबई : नव्या सरकारने छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ही नावे दिली, यातून कुठल्या धर्माच्या विरोधात आम्ही नाही, तर आमच्या देशावर जे आक्रमण झाले त्या गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम यातून केले आहे,

असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे सरकार भाजप-शिवसेना युतीचे असले तरी सर्वच सहयोगी पक्ष या सरकारचे घटक आहेत.

येणाऱ्या काळात त्याचे प्रतिबिंब तुम्हाला दिसेलच, असेही त्यांनी सांगितले. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये फडणवीस यांच्या हस्ते मेटे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मेटे यांनी फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचे आम्ही मानतो, असे सांगत स्तुतिसुमनांची उधळण केली. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, गिफ्टपेक्षा सरप्राईज गिफ्ट हे अत्यंत महत्त्वाचे असते.

राजकारणात तर सरप्राईज गिफ्ट हे अत्यंत महत्त्वाचे आहे, यातूनच आपल्याला उपमुख्यमंत्रीपद मिळाले, असे सांगून ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात काय झाले, ते सर्वांनाच माहिती आहे. पुढचा मार्ग खडतर आहे.

पण आपल्याला पुढे जावेच लागेल. सारथी, अण्णासाहेब ‘पाटील आर्थिक विकास महामंडळ, होस्टेल असे अनेक निर्णय आपण घेतले, पण या सर्व निर्णयांचे महाविकास आघाडीने वाटोळे केले. आपण मतांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी काम केले पाहिजे. तेच आपल्या कामाचे ब्रीद होते आणि यापुढेही राहील.

Must read

- Advertisement -
- Advertisement -

Latest article