Friday, March 24, 2023

मोबाईल गेम चिमुरडीच्या जीवावर बेतला

मोबाईल गेम चिमुरडीच्या जीवावर बेतला

वसई : वसईत स्मार्टफोनवर गेम खेळत असलेली चिमुरडी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. वसई पश्‍चिमेच्या अग्रवाल कॉम्प्लेक्समधील रिजन्सी व्हिला या इमारतीच्या सातव्या मजल्यावर महाजन कुटुंब राहते.

साडेतीन वर्षांची श्रेया महाजन ही आई बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली असता, स्मार्टफोन घेऊन त्यावर गेम खेळू लागली. खेळता खेळता ती बाल्कनीमध्ये आली.

मात्र, या वेळी तिच्या हातातील मोबाईल खाली पडल्याने ती मोबाईलच्या नादात ग्रीलवर चढली. मात्र, याच दरम्यान तोल गेल्याने ती बाल्कनीतून खाली पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे विभागात हळहळ व्यक्‍त होत आहे. या दुर्घटनेची माणिकपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Must read

- Advertisement -
- Advertisement -

Latest article