Friday, March 24, 2023

कचरा टाकण्याच्या कारणातून मायलेकाला मारहाण

कचरा टाकण्याच्या कारणातून मायलेकाला मारहाण

अहमदनगर: कचरा टाकण्याच्या कारणातून मतीमंद मुलासह त्याच्या आईला ल्ला शेजारी जार्री राहणाऱ्या सहा जणांनी मारहाण केली. सावेडी उपनगरातील परीचय हॉटेलच्या पाठीमागे बुधवारी दुपारी व सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री एकनाथ जाधव (वय ४० रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा मतीमंद मुलगा महेश दिवसभर घरी एकटाच असतो. फिर्यादी व त्यांच्या शेजारी राहणारे जाधव कुटूंबात कचरा टाकण्यावरून मंगळवारी वाद झाले होते. यासंदर्भात फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

बुधवारी फिर्यादी कामावर गेलेल्या असताना दुपारी सहा जणांनी रमहेशला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच सायंकाळी फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांना देखील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Must read

- Advertisement -
- Advertisement -

Latest article